एमपीसी न्यूज- मावळ तसेच इतर सर्वत्र काही भागात गेले पाच-सहा दिवस संततधार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इंद्रायणी नदी घाटावरील दुतर्फा दगडी घाट पाण्याखाली गेले असून ते पाणी शनी मंदिराजवळील दुकानात जवळ आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने इंद्रायणी नदी घाटजवळील दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आले(Alandi news) आहेत.
सिद्धबेट बंधाऱ्या जवळील पुल तसेच चाकण चौक ,गरुड स्तंभाजवळील पुलावरून पाणी गेले आहे. आळंदीतील सर्व प्रथम सिद्धबेट जवळील पुल ,चाकण चौक जवळील पुल व नगरपालिका चौक समोरील जुना पुल असे तीन पुल रहदारीस सकाळी बंद करण्यात आले होते. सद्यस्थितीत नगरपरिषद चौका समोरील चौथा ही पुल रहदारी साठी बंद करण्यात आला आहे.नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे बरिगेटिंग करण्यात आली आहे.सिद्धबेट परिसर,माऊली बाग परिसर व ज्ञानेश्वरी मंदिर या परिसरा च्या आत नदीपात्राचे पाणी गेले आहे.इंद्रायणी नदी घाट व इंद्रायणी नदीचे पुल या परिसरात पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाचे आधिकरी व कर्मचारी कार्यरत आहे.