एमपीसी न्यूज – मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू सागरी पुलावरून उडी मारत अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 24) मध्यरात्री(Atal Setu) घडली.
के. श्रीनिवास (वय 38, रा. डोंबिवली) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे(Atal Setu) नाव आहे.
Chinchwad : चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिरात शिरले पावसाचे पाणी
याबाबत माहिती अशी की, केसरी निवास हे नुकतेच कुवेत येथून परतले होते. बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ते घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पत्नी आणि मुलीला फोन करून संवाद साधला. त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू सागरी पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के श्रीनिवास यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी सन 2023 मध्ये कुवेत इथे फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.