एमपीसी न्यूज – महावितरणच्या इंद्रायणी नगर, भोसरी येथील मुख्य केंद्रात ट्रान्सफॉर्मरला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले(Bhosari) नाही.
इंद्रायणी नगर भोसरी येथे महावितरणचे मुख्य वीजपुरवठा केंद्र आहे. या ठिकाणावरून भोसरी आणि पुणे शहराला वीजपुरवठा केला जातो. मुख्य केंद्रातील एका ट्रान्सफॉर्मरला बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आग लागली. ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल हीट झाल्याने ही आग लागल्याचे म्हटले जात आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सुरुवातीला भोसरी आणि पुणे शहराला होणारा वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर पाणी मारून आग विझवली. ट्रांसफार्मर मधील ऑइल सांडले असते तर संपूर्ण परिसरात आग लागण्याचा धोका होता. मात्र वेळीच जवानांनी आग(Bhosari) विझवली. त्यामुळे संभाव्य धोका टळला.