एमपीसी न्यूज – मोरया गोसावी मंदिर परिसरात होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी गेलेली रुग्णवाहिका पावसाच्या पाण्यात मधोमध अडकली आहे. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी घडली.
पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वायसीएम रुग्णालयाची रुग्णवाहिका रस्त्यात अडकली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने रुग्णवाहिका मध्येच थांबवावी लागली. दरम्यान रुग्णवाहिकेत अडकलेले डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची टीम यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तूर्तास रक्तदान शिबिर हे रद्द करण्यात आले आहे.तरी नागरिकांनी कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासन व आपत्कालीन विभागाकडून केले जात आहे.