Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 9:50 am

MPC news

Chinchwad : चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिरात शिरले पावसाचे पाणी

एमपीसी न्यूज – रात्रभर सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे चिंचवड येथील सुप्रसिद्ध मोरया गोसावी समाधी मंदिरात  पवना नदीचे पाणी आज (बुधवारी) सकाळी शिरले असून मंदिरामध्ये जाऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे(Chinchwad) करण्यात आलेले आहे.

 

पवना धरण परिसरात मागील 24 तासात 374 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला असून  नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे.त्यामुळे नदी पात्रावरील बरेच पूल पाण्याखाली गेल्याने  गावांचा संपर्क तुटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिंचवड येथे पवना नदीने मोरया गोसावी मंदिरात प्रवेश केला आहे.

पाण्याने संपुर्ण समाधी मंदिराला वेढा घातला आहे.मुख्य मंदिरासह अन्य सात समाधी मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. मंदिर परिसरात पाणी शिरले की, पाऊस काळ चांगला झाला अशी आख्यायिका आहे.पावसाचा असाच जोर वाढल्यास पाणी पातळी अजून वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी आणि सतर्कता बाळगावी. तसेच मंदिर व नदीकाठ परिसरात सेल्फी काढणे, स्टंटबाजी करणे व परिसरात गर्दी करणे या गोष्टी टाळाव्यात,अशा सूचना मंदिर प्रशासन, चिंचवड पोलिस व पिंपरी- चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Chinchwad)दिल्या आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर