एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कार्यकर्त्याला मॉर्निंग वॉक करत असताना एका दुचाकीने धडक दिली. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी 6:15 वाजताच्या सुमारास चिंचोली (Dehuroad) येथे घडली.
संजय हनुमंत सावंत (वय 58, रा. चिंचोली) असे जखमी माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस (Dehuroad) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद क्षीरसागर (वय 30, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Talegaon-Chakan Road : दिवसा अवजड वाहनांना परवानगी दिल्याने अपघात अन वाहतूक कोंडीत वाढ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय सावंत हे बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आरोपी मिलिंद क्षीरसागर दुचाकीवरून आला. त्याने भरधाव दुचाकी चालवून सावंत यांना धडक दिली. त्यामध्ये सावंत हे जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.