एमपीसी न्यूज – राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दगड आणि माती रस्त्यावर आले आहे. त्यामुळे किल्ल्याकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.मावळ तालुक्यात दोन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रस्ते खचले असून अनेक भागांत घरात पाणी शिरले आहे. अनेक पुल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाने तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Pune rains : मुसळधार पावसामुळे माळीण ते कुंभेवाडी रस्ता दरड कोसळण्यामुळे बंद
त्यातच राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कातळ धार जवळ डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती व दगड-धोंडे रस्त्यावर आले आहे. दरम्यान प्रशासनाने पर्यटनाच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली असून स्थानिकांनी देखील खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.