एमपीसी न्यूज – मागील चार-पाच दिवस मावळ (Maval) तालुक्यात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने मावळ तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मावळातील सर्व धरणे, नद्या, नाले, ओढे ओव्हरफ्लो झाले आहेत. अतिमुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालय यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण तालुका आणि तालुक्यातील शेती जवळजवळ जलमय झाली आहे.
गेली चार-पाच दिवस मावळ (Maval) तालुक्यात मान्सूनचा जोरदार पाऊस पडत असून या पावसाने मावळ तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर मावळातील सर्व धरणे, नद्या, नाले, ओढे हे ओव्हरफ्लो झाले आहेत. अति मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालय यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण तालुका आणि तालुक्यातील शेती जवळजवळ जलमय झालेली दृष्टीस पडत आहे.
गेल्या रविवारपासून मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाची संततधार चालू आहे. गेली दोन-तीन दिवस या पावसाचा जोर अधिकच वाढवून संपूर्ण तालुक्यात सर्वत्र पाणी पाणी झाले आहे भात खाचरांमध्ये आणि सखल भागांमध्ये पाणी साठल्याने भात लावणी गेली दोन-तीन दिवस रखडलेली आहे.
पुणे मुंबई महामार्ग,द्रुतगती महामार्ग तसेच तळेगाव चाकण रस्ता यावरील काही ठिकाणी प्रचंड पाणी साठल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण झालेले आहे तर अंतर्गत भागातील रस्त्यांवरील काही छोटे पूल, मोरया पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Chinchwad : शहरात पावसाचा धुमाकूळ; पोलीस आयुक्तांनी ‘ऑन फिल्ड’ उतरून घेतला आढावा
मावळ (Maval) तालुक्यातील पवना, इंद्रायणी, कुंडलिका,आंद्रा, सुधा या नद्यांना महापूर आलेले आहेत नदीकाठची सर्व शेती पाण्याखाली गेली असून पुराचे पाणी नदीकाठच्या शेतामध्ये लांबपर्यंत पसरलेले आहे. नदी काठावर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या वीज पंप व वीज गृहे ही पाण्याखाली गेल्याने काही गावातील पाणीपुरवठा बंद पडलेला आहे.
तळेगाव शहरातील ऐतिहासिक अशी दोन्ही तळे ही पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून व तळ्याच्या काठावरून पाणी वाहत आहे याशिवाय शहरातील गाव आणि तळेगाव स्टेशन मधील हिंदमाता भुयारी मार्ग संपूर्ण पाण्याखाली गेला असून त्या ठिकाणी सुमारे दहा फूट पाणी इतके वाढले आहे याशिवाय शहरातील सकल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरलेले आहे.
अनेक गावांचा तुटला संपर्क
पवना व इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक पूल पाण्याखाली गेल्याने मावळ (Maval) तालुक्यातील अनेक गावांचा जनसंपर्क तुटला आहे. पवना नदीवरील सांगावडे, धामणे, शिवणे आदी ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत तर इंद्रायणी नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने संपूर्ण तालुकाच जलमय झाल्याचे चित्र या मुसळधार पावसाने निर्माण झाले आहे. दूधवाले,भाजीपालावाले शाळकरी कामगार या सर्वांची मोठी अडचण झाली आहे.
Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel