Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 5:00 am

MPC news

Mumbai : मासमाद्वारे जीएसटी आणि अर्थसंकल्पावर परिसंवाद 

एमपीसी न्यूज – मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन (मासमा) द्वारे जीएसटी आणि अर्थसंकल्पावर आधारित परिसंवादाचे आयोजन (Mumbai) करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 26) माधव बागवाडी येथे हा परिसंवाद संपन्न होणार आहे. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष चंदन भन्साली, जीएसटी ग्रीव्हियन्स समितीचे समन्वयक दिनेश मेहता यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली, अशी माहिती मासमाचे माध्यम संयोजक मंगलचंद सेठ यांनी दिली.

दिनेश मेहता यांनी त्यांच्या समितीने केलेल्या कामांची माहिती दिली. कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी समजावून सांगितली. कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी सहभागी सदस्यांचे कार्यक्रम स्थळी आगमन आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्वांच्या सहकार्यातून हा परिसंवाद यशस्वी करण्याचे आवाहन मेहता यांनी केले.

Alandi : नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सतर्क ते मुळे कुटुंब बचावले !

परिसंवादासाठी प्रमुख पाहुणे मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल असतील. केंद्रीय जीएसटी आयुक्त मनीषा गोयल, राज्य जीएसटी आयुक्त आशिष शर्मा, जीएसटी उपायुक्त विमल मारवाडी, जीएसटी सहाय्यक आयुक्त अभिजीत शेमाटे, सनदी लेखापाल विमल पुनमिया हे अर्थसंकल्पावर माहिती देणार आहेत. या कार्यक्रमाचे संचालन मासमाचे कायदेशीर सल्लागार देवेंद्र हरनेशा करतील.

बँक ऑफ बडोदा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. बैठकीसाठी उपाध्यक्ष गणपत पुरोहित, सचिव प्रवीण अंगारा, सह सचिव अमृत संघवी, सह कोषाध्यक्ष धर्मेन्द्र दोशी, अमित संघवी, निकुंज मेहता, प्रवीण जैन, नवीन मेहता, दिनेश कुमार मेहता उपस्थित होते.

मासमाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष चंदन भन्साली यांनी मासमाच्या सर्व सदस्यांनी परिसंवादात सहभागी होण्याचे आवाहन केले. व्यवसाय करत असताना कर संबंधात येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने कार्यक्रमात सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. सचिव प्रवीण अंगारा यांनी सर्व व्यापारी कार्यक्रमात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर