एमपीसी न्यूज – पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाले(Pavana dam) आहे.
परंदवडी येथून धामणे गावाकडे रस्ता जातो. दरम्यान पवना नदीवर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पवना नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्यात जातो. मागील काही दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना नदीला पूर(Pavana dam) आला आहे.
Mulshi dam : मुळशी धरण 70 टक्के भरले; सखल भागातील संबंधित नागरिकांनी खबरदारी बाळगावी
मागील 24 तासात पवना धरण परिसरात 374 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी नदीवरील पूल पाण्यात गेले आहेत. कार्ला गावातून मळवलीकडे जाणारा पूल देखील पाण्याखाली गेला आहे.पुढे परंदवडी-धामणे दरम्यान असणारा पूल देखील पाण्यात गेला आहे. यामुळे धामणे गावचा संपर्क तुटला आहे. गावाला असलेल्या पर्यायी रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल असल्याने तिथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.