एमपीसी न्यूज – गेल्या काही तासात पिंपरी-चिंचवड शहरात (PCMC) झालेल्या अतिवृष्टीमुळे सोसायट्यांमधील किंवा गृहसंस्थांमधील पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पावसाच्या पाण्यामुळे अथवा दूषित पाणी गेल्यामुळे वापरण्यास अयोग्य झालेले असू शकते. तरी नागरिकांनी दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी करू नये. तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे जेणेकरून रोगराई पसरणार नाही, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पाणीपुरवठा विषयक तक्रारींसाठी सारथी अथवा प्रभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तक्रारींचे निवारण तातडीने करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.