एमपीसी न्यूज – पिंपरी येथील संजय गांधी नगर,सुभाष नगर ,आंबेडकर कॉलनी (pimpri) या ठिकाणी अतिदृष्टीमुळे सर्वच घरामध्ये पाणी साचल्याने नदीकाठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
संजय गांधीनगर, आंबेडकर कॉलनी ,सुभाष नगर परिसरातील नागरिकांना कमला नेहरू शाळा, वाल्मिकी आश्रम व कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांची राहण्याची, जेवणाची तसेच लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी याठिकाणी केली जात आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देखील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.यासाठी सहा.आयुक्त ननावरे,कार्य अभियंता निंबाळकर ,उपअभियंता महेश तावरे , कनिष्ट अभियंता रोकडे ,वैद्यकीय अधिकारी सुनिता साळवे यांच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत.नागरिकांनी आवशकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.