एमपीसी न्यूज – जेवणाच्या पैशांवरून एकाने तरुणाला बेदम मारहाण केली. टोकदार वस्तुने मारून दुखापत केली. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नेहरुनगर, पिंपरी (Pimpri) येथे घडली.
विष्णू गट्टरदास बिरादार (वय 26, रा. पिंपरा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोपाळ माणिकराव कळसे (वय 32, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिरादार गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना जेवणाचे पैसे मागितले. बिरादार यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी नंतर देतो असे सांगितले. त्यावरून आरोपीने बिरादार यांना शिवीगाळ करून खिशातील टोकदार वस्तूने गळ्याच्या डाव्या बाजूला मारून जखमी केले. पिंपरी (Pimpri) पोलीस तपास करीत आहेत.