Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 9:02 am

MPC news

Pune : वडगाव शेरीतील आनंदनगर बसस्टॉप येथे एका वाहनावर झाड कोसळले;सुदैवाने जीवितहानी झाली नाही

एमपीसी न्यूज -पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज सकाळी वडगाव शेरीतील आनंदनगर बसस्टॉप(Pune) येथे एका वाहनावर झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नसून अग्निशमन दल त्याठिकाणी रवाना झाले आहे.

याबाबतची माहिती मिळत आहे की,मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यांवर आणि ठिकठिकाणी पाणी साचलेले असून शहरातील बऱ्याच ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना(Pune) घडल्या आहेत.

Pune Rains : पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांत घाट परिसरात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यातील मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात आला आहे.

 

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर