Explore

Search
Close this search box.

Search

March 25, 2025 2:50 pm

MPC news

Pune : पुणे जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 26) रोजी सुट्टी द्यावी. त्याची घोषणा गुरुवारी (दि. 25) जाहीर करावी, याबाबत उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे (Pune) जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. 

पुणे जिल्हा व पुणे शहरामध्ये मागील दोन दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातही पुणे जिल्हयातील मुळशी, मावळ, खेड, वेल्हे व भोर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे  खडकवासला, पवना या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातून मुळा व मुठा या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. पुणे शहरातील (Pune)अनेक सखल भागात, झोपडपट्टयांमध्ये व अनेक सोसायटयांमध्ये मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी शिरले आहे.

तसेच अतिवृष्टी व पुरामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ व धोकादायक झालेली आहे. पुणे शहर व पुणे जिल्हयातील शाळांना गुरुवारी (दि. 25) अतिवृष्टी व पूरामुळे सुट्टी असल्याचे गुरुवारी सकाळी सकाळी जाहिर केले. परंतु याची माहिती शाळा व्यवस्थापन, पालक व विद्यार्थ्यांना वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक पालकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ झाली.

Train Cancelled : मुसळधार पावसामुळे डेक्कन क्वीन, प्रगती, इंटरसिटी एक्सप्रेस रद्द 

आजही पुणे शहरामध्ये (Pune) व पुणे जिल्हयात मुसळधार पाऊस सुरु असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नदी-नाल्यानां पूर आलेला आहे. पूर आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुणे शहरातील सर्व शाळांना व पुणे जिल्हयातील अतिवृष्टी होत असलेल्या तालूक्यातील शाळांना शुक्रवारी (दि.26) सुट्टी असल्याचे आजच आदेश निर्गमीत करावेत व त्या आदेशाला प्रशासनामार्फत व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्वांना कळविण्यात यावे. यामुळे पालकवर्ग व विद्यार्थ्यांना जिव धोक्यात घालून शाळेत जाण्याची आवश्यकता पडणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर