एमपीसी न्यूज – मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्रीपासून झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शहरात 2 ठिकाणी भिंती कोसळल्या आहेत. तसेच, 6 ठिकाणी घरात प्रचंड प्रमाणात पाणी(Pune rains) शिरले आहे.
काल सकाळी (बुधवार) सात वाजल्यापासून आज (मंगळवारी) सकाळी सात वाजेपर्यंत एकूण 45 झाडे कोसळली असल्याची माहिती मिळत आहे. शहरातील विविध ठिकाणी झाडे पडल्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले असून या घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.अग्निशमन दल नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात झाडपडी 45 ठिकाणी झाली आहे. तसेच भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली व कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक भिंत पडून खड्डा पडला(Pune rains) आहे.

तसेच, पुण्यातील 6 सखल भागात पाणी शिरले आहे. यात वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत – शिवणे, सदगुरू सोसायटीत – सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये – नदीपात्र रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौक – शिवाजीनगर या भागांचा समावेश आहे.सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे कार्यवाही(Pune Rain) सुरू आहे.