Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 11:24 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Sangavi : सांगवीत अग्निशमन दलाने केली तेरा नागरिक व दोन मांजरांची सुटका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोसळत असलेल्या जोरदार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे घरात अडकलेल्या तेरा नागरिक व दोन मांजरांची अग्निशमन विभागाने (Sangavi) सुटका केली.

पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे ठीक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसाचा फटका पिंपरी-चिंचवड मधील सर्वच भागाला बसला आहे. नदी काठच्या संजय गांधीनगर, आंबेडकर कॉलनी ,सुभाष नगर परिसरातील नागरिकांना कमला नेहरू शाळा,वाल्मिकी आश्रम व कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

Chinchwad: बँकेतून बोलत असल्याचे सांगत एक लाखाची फसवणूक 

सांगवी (Sangavi) भागातही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी आले होते. घरांमध्येही पाणी शिरले होते. जुनी सांगवीतील मधूबन लेनमध्ये पाण्यामुळे काहीजण अडकले होते. पावसामुळे घरात अडकलेल्या तेरा नागरिक व दोन मांजरांची अग्निशमन विभागाने सुटका केली. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर