एमपीसी न्यूज – पत्नीच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास सुदर्शन नगर, चिखली येथे घडली.
बापू किसन गायकवाड (वय 55 रा. महात्मा फुले नगर, चिखली रोड, चिंचवड) यांनी गुरुवारी (दि 25) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल विक्रम खवळे (रा. सुदर्शन नगर, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी लीला हिचे तिचा पती विशाल याच्यासोबत घरगुती कारणावरून भांडण झाले. यामुळे संतापलेल्या आरोपी विशाल याने कठीण वस्तूने लीला यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर व डोक्याला डाव्या बाजूस कोणत्यातरी कठीण वस्तूने मारले. त्यामुळे लीला यांच्या कोपराचे हाड तुटले व डोक्यात मोठी गंभीर जखम झाली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.