एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी, पिंपरीगाव,फुगेवाडी,मोरवाडी, (Pimpri)दापोडी, भागात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची सूचना आमदार अमित गोरखे यांनी तहसीलदारांना केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी, पिंपरीगाव, फुगेवाडी मोरवाडी, लालटोपीनगर, दापोडीसह सखल भागात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी. पुणे जिल्ह्यात गेली 3 ते 4 दिवस सलग अतिवृष्टी होत आहे. नागरिकांचे दैनंदिनी व्यवहार ठप्प झाले आहे.
Chinchwad : वडापावची खंडणी मागणाऱ्या तीन भुरट्या भाईंना अटक
अशातच पिंपरी-चिंचवड शहरात कासारवाडी, पिंपरी गाव, फुगेवाडी, मोरवाडी, दापोडी, भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. या अशा अस्मानी संकटाच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. लोकांचे संसार उघड्यावर आले. काही भागात घराच्या भिंती ढासळलेल्या आढळून आल्या या सर्व पूरग्रस्त भागाची आमदार गोरखे यांनी पाहणी केली. त्यानंतर तहसीलदारांना तातडीने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले.