एमपीसी न्यूज – मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या (Pimpri)पुरात नदीतील एका बेटावर गाय अडकली. या गाईला चार दिवसानंतर सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. यासाठी लाईफ प्रोटेक्शन अँड कंजर्वेशन ट्रस्ट, एनडीआरएफ, बजरंग दल, अग्निशमन दल, अलंकापुरी रेस्क्यू टीम, शिवदुर्ग रेस्क्यू टीम यांनी मदत केली.
मागील चार दिवसांपासून नदिमधील बेटावर एक गाय अडकल्याची माहिती लाईफ प्रोटेक्शन अँड कंजर्वेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विक्रम भोसले यांना गुरूवारी (दि. 25) मिळाली. ट्रस्टच्या सदस्यांनी गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने गुरुवारी मदतकार्य थांबवण्यात आले.
Pimpri-Chinchwad : अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4500 नागरिक स्थलांतरीत
शुक्रवारी पुन्हा एनडीआरएफ, बजरंग दल, अग्निशमन दल, अलंकापुरी रेस्क्यू टीम, शिवदुर्ग रेस्क्यू टीम यांना पाचारण करून मदतकार्य सुरू झाले. माजी नगरसेविका विनया तापकीर व स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाईला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. गाईची तपासणी केली असता ती गाभण असल्याचे निदर्शनास आले. गाईला सुरक्षित बाहेर काढल्याने दोन जीव वाचवल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.