एमपीसी न्यूज – सदर्न कमांडने 25 वा कारगिल विजय दिवस मोठ्या (Pune)अभिमानाने आणि उत्साहात साजरा केला . कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या गौरवशाली विजयाला आज 25 वर्षे पूर्ण झाली. कारगिल युद्ध हे आपल्या रक्ताने आणि सर्वोच्च बलिदानाने इतिहासात एक सुवर्ण अध्याय कोरलेल्या शूरवीरांच्या निःसंदिग्ध शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून देते.
दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे आयोजित एका समारंभात लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, अति विशिष्ट सेवा पदक, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड, यांनी पुष्पचक्र अर्पण करून आपल्या हुतात्मा जवानांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाला आदरांजली वाहिली. युद्धात भारताला शानदार विजय मिळवून देणाऱ्या शूर जवानांच्या शौर्य आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी आजी आणि माजी लष्करी अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Pune : गुरुकुल प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. शेठ यांना प्रदान
कारगिल विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दक्षिण कमांडने गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी बाईक रॅली, वृक्षारोपण, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वीरगाथा यांसह विविध कार्यक्रम आयोजित केले. ज्यामध्ये कारगिल युद्धातील माजी जवानांनी संवाद साधला. या कार्यक्रमांचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत शौर्याची गाथा पोहोचवणे, आपल्या शूर जवानांचा पराक्रम साजरा करणे आणि त्यांचे स्मरण करणे हा आहे.