Explore

Search
Close this search box.

Search

March 21, 2025 4:43 pm

MPC news

Rainfall News : पावसाने उसंत दिल्याने धरणांमधून होणारा विसर्ग घटला

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने शुक्रवारी (दि. 26) (Rainfall News)काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमधून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पावसाचा वेग वाढल्यास पुन्हा धरणामधील विसर्ग वाढवला जाणार आहे.

लोणावळा धरण

लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून 120 क्युसेक करण्यात आला. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले.

Hinjawadi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी मधील वाहतुकीत बदल

कासारसाई धरण

कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात विसर्ग कमी करून 120 क्यूसेक करण्यात आला आहे. पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल असे खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक दोनचे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले.

खडकवासला धरण

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून शुक्रवारी सकाळी सात वाजता 13 हजार 981 क्यूसेक केला आहे. आवश्यकतेनुसार बदल केला जाणार आहे. नागरिकांनी दक्षता बाळगावी. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

मुळशी धरण

मुळशी धरणातून सुरू असलेला 10 हजार 700 क्यूसेक विसर्ग स्थिर आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले.


वीर धरण

वीर धरणाची पाणी पातळी 579.23 मीटर झाली आहे. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे होणारा विसर्ग कमी करून तो 4 हजार 637 क्यूसेक करण्यात आला आहे. विसर्ग वाढवून 61 हजार 488 क्यूसेक करण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी सांगितले.

पानशेत धरण

पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत आहे. पानशेत धरण जलाशय गुरुवारी (दि. 25) रात्री 11 वाजता 83 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून किंवा विद्युत निर्मिती केंद्रामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.नदी काठच्या सर्व नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी कळविले आहे.

 

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर