एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र अभियंत्रिकीमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. जयंती निमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात(Talegaon Dabhade) आले.
याप्रसंगी अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, मानव संसाधन प्रमुख पल्लवी धुमाळ, शैक्षणीक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आदी मान्यवर(Talegaon Dabhade) उपस्थित होते.
” लोकमान्य बालगंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र चळवळीतील एक महत्वपूर्ण नेते होते. ते एक शिक्षक, संपादक, लेखक आणि वकील होते. सार्वजनिक गणेशोस्तव हा टिळकांनी महाराष्ट्रात सुरु केला,” अशी माहिती प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी बोलताना दिली.
“लोकमान्य टिळक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या ऐतिहासिक वारसा असलेल्या पावन भूमी मध्ये आपण कार्य करत आहोत हे आपले भाग्य आहे,” असे उद्गार अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी बोलताना काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर ढोरे यांनी केले. तर डॉ. प्रसाद ढोरे यांनी आभार व्यक्त केले.