Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 4:57 am

MPC news

Today’s Horoscope 26 July 2024 : आजचे राशीभविष्य

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग आजचा दिवस – शुक्रवार. Today’s Horoscope 26 July 2024  आजचे राशीभविष्य

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा 14.30 पर्यंत नंतर रेवती.

चंद्र राशी – मीन.
—————————–

मेष- ( शुभ रंग- पिस्ता)
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला आश्वासने देऊ नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. (Today’s Horoscope)

मिथुन (शुभ रंग – पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. वडील आज योग्य सल्ले देतील.

कर्क ( शुभ रंग- क्रीम)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. स्वतःवर संयम असू द्या.

सिंह ( शुभ रंग- जांभळा)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उदयावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

कन्या (शुभ रंग- मरून)
सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून मोकळे व्हा. संध्याकाळी मोठे आर्थिक व्यवहार जपूनच करा. व्यावसायिक निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घ्यायला हवे.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील काही मतभेद दुपारनंतर निवळतील.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. आज हीतशत्रू तुमच्या चुका शोधत आहेत. सावध राहा.

धनु (शुभ रंग- आकाशी)
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

मकर (शुभ रंग- मोरपंखी)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही आज नुकसानाला कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

कुंभ ( शुभ रंग- हिरवा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

मीन (शुभ रंग- निळा)
व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. येणी वसूल होतील. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल.

शुभम भवतु.

जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर