एमपीसी न्यूज – ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांना अपंगत्वाचा दाखला कसा मिळाला, तो मिळवून देण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्याने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर दबाव आणला याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली आहे.
अपंगत्वाचा दाखला मिळण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. एकदा दाखला काढला की दुसरा दाखला कुठेही काढायला गेले तरी नाव टाकताच अगोदरच दाखला इश्यू झाल्याचे समजते, अशा परिस्थितीत वायसीएममध्ये पूजा खेडकर यांना अपंगत्वाचा दाखला कसा मिळाला, तो मिळवून देण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्याने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर दबाव आणला, याची चौकशी झाली पाहिजे.
Talegaon-Chakan Road Accident : व्यावसायिक संजय दिसले यांचे अपघाती निधन
वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी पूजा खेडकर यांना 7% अपंग असल्याचा दाखला दिला असल्याचे सांगितले. 7% अपंगत्वच्या दाखल्यावर कुठलीही शासकीय सुविधा मिळत नसल्याचे सांगून सदर दाखला देण्यामध्ये कुठलीही अनियमितता झालेली नाही असे म्हणून संबंधित डॉक्टरला क्लीन चिट देण्याचा जो प्रकार केला आहे, तोही एक खूप मोठा भ्रष्टाचार आहे. या संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे. सामान्य अपंगांना दाखला काढण्यासाठी किती त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे, पूजा खेडकर यांना एका दिवसात कसा दाखला दिला गेला हे ही सर्वांना समजले पाहिजे, असेही कांबळे म्हणाले.