एमपीसी न्यूज – मावळ भाग, धरण क्षेत्र भाग व इतर सर्व काही भागात गेले पाच सहा दिवस संतत पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन गुरुवार (दि.25) रोजी आळंदीतील (Alandi) इंद्रायणी नदीला पूर आला होता. पूर परिस्थिती वेळी पोलीस व पालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सदैव कार्यरत होते. या प्रशासनाच्या योग्य नियोजना मुळे कुठलीही दुर्घटना घडली नाही.
यानिमित्ताने आळंदी शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट) राहुल चव्हाण यांच्या वतीने पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार दि. 26 रोजी करण्यात आला. तसेच पूर परिस्थिती वेळी सदैव कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार ही त्यांनी मानले.
Santosh Dabhade : तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्षपद तिसऱ्यांदा संतोष दाभाडे यांच्याकडे