एमपीसी न्यूज – महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 2 आरोपींना (Mahalunge)अटक करत त्यांच्याकडून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
मोसिम अय्याज शेख (वय 27 रा. खंडोबा माळ, चाकण) व आरिफ अफजल शेख, (वय 28 रा. खंडोबा माळ, चाकण ) अशी अटक आरोपींची नावे असून दोघे ही मुलाचे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघे चाकण परिसरात खासगी नोकरी करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पेट्रोलिंग व वेगवेगळ्या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून तसेच घटना घडलेल्या ठिकाणी सीसीटिव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
Pimpri : शहरात डेंग्यूचे 36 रुग्ण
त्यावेळी दोन इसम मोटार सायकल चे हॅन्डल लॉक तोडून चोरुन घेऊन जाताना दिसले. महाळुंगे पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहात त्यांचा शोध घेतला असता, त्यातील एक इसम हा वोक्स वॅगन कंपनीत दोन दिवस काम करुन काम सोडून गेलेला असल्याचे समजले. त्याचे नाव त्याचे नाव मोसिम अय्याज शेख होते. तपास पथकाने त्याचा शोध घेऊन त्यास चाकण येथून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा दुसरा साथीदार आरिफ अफजल शेख याच्यासह त्याने मोटारसायकल चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.
दोघांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांचा आणखी दोन मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडुन 1लाख रुपये किंमतीच्या तीन मोटार सायकल जप्त केल्या. तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
महाळूंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस हवालदार राजू कोणकेरी, राजू जाधव, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष चाफळे पोलीस नाईक संतोष काळे, किशोर सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, मंगेश कदम, अमोल माटे यांनी केली.