एमपीसी न्यूज – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरुपात व्हावा ,राज्यातील नामवंत विचारवंत ,साहित्यिक व कलाकारांचा समावेश करावा अशी सूचना आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंत्ती महोत्सव साजरा करीत असते. त्या पार्श्वभूमीवर आमदार गोरखे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. तसेच शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवरती आयुक्त सिंह यांच्यासोबत चर्चा केली. शहरातील नागरिकांचे, झोपडपट्टीतील विविध प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होते. त्यासाठी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आमदार गोरखे यांनी आयुक्तांशी महापालिकेत चर्चा केली. लवकर या प्रश्नांना सोडवण्यात यावे असे ही यावेळी सांगण्यात आले.
Zika Virus : पुण्यात दोन रुग्णांना झिका विषाणू संसर्गाचे मरणोत्तर निदान
महापालिकेतर्फे दरवर्षी 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यान “प्रबोधन विचार पर्व” च्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जातो. या जयंती उत्सवा मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रातील थोर विचारवंत,कलावंत, यांच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचारांची आदान प्रदान केली जाते. त्या भव्य दिव्य कार्यक्रमाला महापालिके कडून जास्तीत-जास्त निधी मिळावा यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतील अध्यक्ष व समिती सदस्यांना सोबत घेऊन आयुक्तांशी यासंदर्भात चर्चा केली. आयुक्तांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आमदार गोरखे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड मधील प्रश्न सोडविण्यासाठी, महापालिका, राज्य शासनाच्या माध्यमातून मी नक्कीच येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.