एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात (Pimpri)डेंग्यु आजाराच्या निदानासाठी एकुण 4018 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये डेंग्यु आजाराचे 36 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी 18 पुरुष व 18 महिला रुग्ण आहेत.
चिकुनगुण्या आजाराच्या निदानासाठी एकुण 128 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये चिकुनगुण्या आजाराचे 3 रुग्ण आढळुन आले आहेत. या रुग्णांपैकी 2 पुरुष व 1 महिला रुग्ण आहेत. तसेच “ डेंग्यु मुक्त पीसीएमसी (BEAT Dengue Campaign)” अंतर्गत प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास या मोहिमेअंतर्गत रविवारी सकाळी 9 ते 10 हि वेळ स्वत:करीता देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास अंतर्गत नागरीकांनी आपल्या घराच्या आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परिक्षण करावे पाणी साचणारी सर्व ठिकाणे (डासोत्पत्ती स्थाने) नष्ट करावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.