Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 7:23 am

MPC news

Pimpri : पूरग्रस्त भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – पूरग्रस्त व अति पावसाच्या पूरसदृश्य(Pimpri) भागामधील नागरिकांची वैद्यकीय विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नद्यांना पुर आल्याने नदिकाठच्या व पुरबाधित नागरिकांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी वैद्यकिय विभागाने रुग्णालय झोन निहाय 16 पथके तयार केलेली असून सदर पथकांमार्फत या नागरिकांची आरोग्य तपासणी करुन लक्षणानुसार औषधोपचार करण्यात येत आहेत.

Shirgaon :पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फावडा मारून जीव मारण्याचा प्रयत्न

पूरपरिस्थिती व ठिकठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे वैद्यकीय विभागामार्फत एम.पी.डब्ल्यु, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत पुरबाधित परिसरामध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जनजागृती व आजारी नागरिकांना औषधोपचार पुरविण्यात येत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते यासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे असे वैद्यकिय विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर