एमपीसी न्यूज – दोन दिवसाच्या मुसळधार पावसात गुरवारी (दि.25) कात्रज (Pune), लेक टाऊन येथून एक उवाक वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आज (शनिवारी) डेंगळे पुलाजवळ सापडला.
युवक वाहून गेल्याची वर्दी मिळाल्या नंतर पुणे अग्निशमन दलाची चार पथके शोध कार्यासाठी रवाना करण्यात आली होती.शोध कार्य सुरू असताना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास डेंगळे पुलाजवळील (Pune) पात्रामध्ये मृतदेह आढळला. अद्याप युवकाची ओळख पटली नसून पुढील कारवाईसाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.