Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 8:44 am

MPC news

Pune: तेजस्विनीची राज्य ज्युनियर मुलींच्या कर्णधारपदी निवड-  कोल्हापुरातील शिबिरानंतर विफाची घोषणा, पुण्यातील 4 खेळाडूंचा समावेश

एमपीसी न्यूज – -बेळगाव, कर्नाटक येथे होणार्‍या ज्युनियर मुलींच्या (Pune)राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुली संघाच्या कर्णधारपदी पुण्याच्या तेजस्विनी थाप्पा हिची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 29 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान स्पोर्टिंग प्लॅनेट लव्हडेल सेंट्रल स्कूल मैदानावर खेळली जाणार आहे.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) निवडलेल्या महाराष्ट्राच्या 22 सदस्यीय संघात नवमी शानभाग, दिया पाययप्पिल्ली (बचावपटू), तेजस्विनी, थाप्पा – कर्णधार, तनिषा अजमेरा (मिडफिल्डर) या पुण्याच्या चार खेळाडूंचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सराव शिबीर आणि निवडचाचणी कोल्हापूर येथे घेण्यात आली. त्यातून संघनिवड करण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा समावेश ब गटात असून त्यात  राजस्थान, त्रिपुरा आणि पाँडेचेरी हे संघ आहेत.

महाराष्ट्र संघाचे सामने:

29 जुलै: विरुद्ध पाँडेचेरी

31 जुलै: विरुद्ध त्रिपुरा

2 ऑगस्ट: विरुद्ध राजस्थान

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर