एमपीसी न्यूज – तळेगाव शहर भाजपाचे माजी नगरसेवक, निर्मल वारीचे संयोजक संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) (Santosh Dabhade) यांची तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसे त्यांना पुणे जिल्हा भाजपाचे (उत्तर पूर्व विभाग) अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टी तळेगाव शहर पक्ष कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे कोषाध्यक्ष इंदरशेठ ओसवाल, माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी अध्यक्ष अशोक दाभाडे, सुरेश झेंड, आजी- माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
Maval : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने केली 25 जणांची सुटका
यापूर्वीचे अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या जागेवर संतोष दाभाडे (Santosh Dabhade) यांची नियुक्ती करण्यात आली. संतोष दाभाडे यांनी सन 2013 ते 2016 व 2016 ते 2019 या कालावधीमध्ये अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता आली होती.
संतोष दाभाडे (Santosh Dabhade) हे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सचिव,सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, तसेच ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त तर सह्याद्री इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.