एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात फावडा मारून (Shirgaon)जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.26) शिरगाव येथे भांगरच्या दुकानात घडली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी इस्लाम जमिरुल्लाह खान (वय 37 रा. गहुंजे) पवन विश्वनाथ मोरे (वय 25 रा. चिंचवड) अक्षद शशिकांत जगताप (वय 18 रा. चिंचवड) या तिघांना अटक केली आहे. तर त्यांचा साथीदार महेश इंगवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात 42 वर्षीय पॉप महिलेने फिर्यादीला आहे.
RTO : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा योगेश प्रल्हाद साठे (वय 26) याच्याशी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी भंगारच्या दुकानात असलेल्या फावड्याने योगेशच्या डोक्यात मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.