Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 5:58 am

MPC news

Talegaon : गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात कारागिरांकडून गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग

एमपीसी न्यूज-‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत बाप्पाला निरोप दिल्यानंतर पुन्हा बाप्पाच्या आगमनाची आतुरता प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात असते. यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. 

शहरातील (Talegaon) कुंभार समाज तसेच मूर्ती बनवणारे व्यावसायिक गणेश मूर्ती बनविण्याच्या तयारीला लागले आहेत. व्यापाऱ्यांनी देखील घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या देखाव्यासाठी लागणारे साहित्य मागवण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण शहरातील बाजारपेठ रंगबिरंगी आणि आकर्षक साहित्याने सजणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवास महिना सव्वा महिना बाकी असला तरी तळेगाव शहर परिसरातील (Talegaon) स्थानिक कलाकाराकडून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आहे.

Talegaon Dabhade  : नवीन मतदार नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐतिहासिक अशा तळेगाव दाभाडे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा अतिशय भव्य आणि मानाचा असतो. यासाठी लागणाऱ्या मूर्ती स्थानिक कलाकार हे बनवत असतात. शहरात आणि परिसरात सुमारे 15 हजाराच्या जवळपास गणेश मूर्ती या दरवर्षी भाविकांकडून विकत घेतल्या जातात. त्या बनविण्यासाठी स्थानिक कलाकार सहा ते आठ महिने हे परिश्रम घेत असतात.शेवटचा महिना राहिल्याने स्थानिक कलाकारांनी या मूर्ती बनवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यायला सुरुवात केलेली आहे.

तळेगाव शहरातील पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणारी कुंभार समाजातील काही मंडळी आणि त्यांचे स्थानिक कलाकार आपापल्या घरी आणि कारखान्यांमध्ये सध्या या मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत.

Santosh Dabhade : तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्षपद तिसऱ्यांदा संतोष दाभाडे यांच्याकडे 

तळेगाव शहरांतील मूर्तिकार किशोर दरेकर व गणेश दरेकर हे सध्या अशा प्रकारच्या मूर्ती बनविण्यामध्ये व्यस्त असून त्यांच्यासह शहरातील 20 ते 30 ठिकाणी अशाच प्रकारच्या मूर्ती बनविण्याचे काम सध्या वेगाने चालू आहे. 75 टक्के मूर्तीचे काम पूर्ण झालेले असून रंगविण्याच्या अंतिम तयारी मध्ये हे कलाकार आहेत.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर