एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना नवी मुंबई येथून अटक (Chinchwad)केली. तसेच पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना सांगवी परिसरातून अटक केली. याबरोबरच खुनाच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला चाकण येथून अटक केली. या तीनही कामगिरी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केले आहेत.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी टोळी प्रमुख विकी खराडे याचा थांबपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता खराडे हा नवी मुंबई येथे असल्याचे समजले. पोलिसांनी नवी मुंबई येथे जाऊन आरोपी विवेक उर्फ विकी राजेश खराडे (वय 20) आणि पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे (वय 24, दोघे रा. कामाठीपुरा, ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक केली. या आरोपींकडून गुंडाविरोधी पथकाने दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
या आरोपींकडे केलेल्या तपासात प्रियदर्शनीनगर ते ममतानगर रोडवर जुनी सांगवी येथे जाऊन रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय 22) आणि अनिकेत सतीश काजवे (वय 28, दोघे रा. जुनी सांगवी) यांना अटक करून त्यांच्याकडून देखील एक लाख 44 हजारांची दुचाकी, दोन गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाचे शंभराव्या वर्षात पदार्पण
तिसऱ्या कारवाई मध्ये चाकण पोलीस ठाण्यातील सन 2019 मधील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या तुषार उर्फ गोल्या रामराव राठोड (वय 26, रा. आळंदी) याला अटक केली. त्याला महाळुंगे एमआयडीसी चाकण येथून ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त डॉ वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक अशोक जगताप, हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहिते, तौसीफ शेख, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.