Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 1:43 am

MPC news

Mahalunge : टास्कच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – प्रीपेड टास्क खेळण्यास सांगत एका व्यक्तीकडून एकूण 18 लाख 96 हजार रुपये घेत त्याची फसवणूक केली हा प्रकार 27 फेब्रुवारी ते 18 एप्रिल या कालावधीत खराबवाडी येथे घडला.

चिक्काबसप्पा रमेश बाबू झा (वय 58, रा. खराबवाडी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Paris Olympics 2024 : भारताने उघडलं खातं; मनु भाकरने घडवला इतिहास, कांस्य पदकावर कोरलं नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांना VIP Google global working grup या टेलिग्राम ग्रुपवर ऍड केले त्यांना प्रीपेड टास्क खेळण्यास सांगितले. दरम्यान त्यांच्याकडून टास्क खेळण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली. टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे सांगण्यात आले. अधिक नफा झाल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी 18 लाख 96 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर