Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 8:27 am

MPC news

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदी विशाल काळभोर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी विशाल बाळासाहेब काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदावर एका तरुण नेत्याची प्रथमच निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने(Pimpri) आता तरूणांकडे नेतृत्व दिल्याचे बोलले जात आहे. 

काळभोर यांना आमदार रोहित पवार, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर व पक्षाचे आजी-माजी नगरसेवक व प्रमुख पदधिकारी(Pimpri) उपस्थित होते.

Dehuroad : भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या म्यानमारच्या दोघांना अटक

विशाल काळभोर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी- चिंचवड शहर सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणीमध्ये प्रदेश संघटक, प्रदेश सरचिटणीस नाशिक, पुणे आणि कल्याण डोंबिवलीचे प्रभारी त्यानंतर युवकचे ऑल महाराष्ट्र कॉर्डिनेशन आणि पिंपरी विधानसभा अध्यक्ष यासारख्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी कामकाज पाहिले आहे. नियुक्तीनंतर बोलताना विशाल काळभोर म्हणाले की, पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या अशा कार्याध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरवून दाखवू. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस पध्दतीचे यश मिळवून देण्यासाठी आपला अटोकाट प्रयत्न असेल.

राजकारणात आत्तापर्यंत पक्षातील सहकारी मित्रांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे आपण ही मजल मारू शकलो. भविष्यातही सर्व मित्र आणि सहकार्यांना सोबत घेऊन आपण पक्ष संघटनेत आणि सामाजिक जीवनात कार्य करत राहणार असल्याचेही विशाल काळभोर यांनी म्हटले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर