Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 6:53 pm

MPC news

Nigdi : प्राधिकरणातील कॅफे टाईम कॉफी शॉप चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील कॅफे टाईम या कॉफी शॉपवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कॉफी शॉप मध्ये अंधाऱ्या खोलीत मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी करण्यात आली.

चैतन्य सुभाष रेगडे (वय 23, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad : भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या म्यानमारच्या दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कॉफी शॉप चालवण्याचा कुठलाही परवाना नसताना त्याने कॅफे टाईम हा कॉफी शॉप सुरू केला. कुठलेही खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी न ठेवता वरच्या मजल्यावर आत मध्ये अंधाऱ्या खोलीत लाकडी प्लायवूडचे कंपार्टमेंट बनवून त्याला बाहेरून पडदे लावले. आत मध्ये सोफे ठेवून मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर