एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरातील राही रुक्मिणी महिला भजन मंडळास भाविक शामराव बाळासाहेब भेगडे यांचेकडून भजन साहित्य भेट(Talegaon Dabhade) देण्यात आले.
शामराव बाळासाहेब भेगडे यांनी आपल्या वडिलांचे स्मरणार्थ हे भजन साहित्य मृदुंगांसह राही रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला भेगडे आणि उपाध्यक्ष सीमा कुलकर्णी यांच्याकडे मंदिरामध्ये(Talegaon Dabhade) सुपूर्द केले.
तळेगावातील भाविक महिलांकरिता नुकतेच राही रुक्मिणी महिला भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील भाविक महिलांना वारकरी सांप्रदायाची गोडी व आवड निर्माण व्हावी त्यांना भजन,प्रवचन याचे प्रशिक्षण घेण्यासाठी या मंडळाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी मंदिर पुरोहित अतुल काका देशपांडे यांच्यासह अनेक भजन करी उपस्थित होते.