Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 9:03 am

MPC news

Amit Gorkhe: आमदारकीची शपथ घेतल्यावर अमित गोरखे यांनी दिल्या घोषणा, ‘जय लहुजी, जय भीम, जय संविधान’!

एमपीसी न्यूज – विधान परिषद सदस्य म्हणून नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे (Amit Gorkhe) यांनी काल (रविवारी) शपथ घेतली. त्यानंतर ‘जय लहुजी, जय भीम, जय संविधान’, असा जयघोषही केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात तो चर्चेचा विषय झाला. 

अमित गोरखे यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाने प्रथमच मातंग समाजाला आमदारकीची संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर गोरखे यांनी ‘जय लहुजी’ ही घोषणा देत आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले.

Today’s Horoscope 29 July 2024 : आजचे राशीभविष्य

भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संधीमुळे अमित गोरखे यांनी विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, मिलिंद नार्वेकर व इतर सदस्य उपस्थित होते.

शपथ घेताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व भारताच्या संविधानाला स्मरण करून नमन केले. महाराष्ट्राचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे गोरखे यांनी आभार मानले.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर