Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 8:31 am

MPC news

Bhosari : रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या अध्यक्षपदी दिपक सोनवणे,सचिवपदी डॉ. संतोष मोरे

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा (Bhosari )पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरीयन शितल शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. रोटरी क्लब डायनॅमिक भोसरी अध्यक्ष 2023-24 चे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे दीपक सोनवणे यांच्याकडे तर सचिवपदाची सूत्रे दीपक सोनवणे यांनी डॉ. संतोष मोरे यांच्याकडे हस्तांतरित केली.

स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व जागतिक पातळीवर केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी वर्षभरात झालेल्या प्रकल्पांसह कार्यअहवाल मांडला.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला 

रोटरी 3131 प्रांतपाल शितल शहा यांच्यासह फर्स्ट लेडी रागिनी शहा यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन शपथ दिली. रोटरी क्लबच्या आगामी वर्षात नियोजित उपक्रम व नवीन टिमचे स्वागत नूतन अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केले. आभार नवनिर्वाचित सचिव डॉ. ‌संतोष मोरे यांनी मानले.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर