एमपीसी न्यूज – आज (दि.30) रोजी आळंदीमध्ये माऊलींच्या पालखीचे सायंकाळी सव्वासाच्या सुमारास आळंदी नगरपरिषद चौकात माऊलीच्या जयघोषात वरूण राजाच्या हजेरीत आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झाले. तसेच नगरपरिषदेच्या वतीने माऊलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
Pimpri :डॉ.पं. नंदकिशोर कपोते यांची संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या अध्यक्षपदी निवड
माऊलींच्या पालखी स्वागतासाठी आळंदीतील हजारो वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगासह ठीक ठिकाणी हजेरी लावली होती.परतीच्या या वारीत माऊलींच्या आगमनानिमित्त अनेक महिला आणि पुरुष तसेच वारकरी विद्यार्थी फुगडी खेळताना दिसत होते .तसेच या वारीतील भाविक हरिनामाच्या गजरात दंग झाले होते. आळंदी शहरात वारकरी भाविकांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.माऊलींच्या पालखी आगमनानिमित्त अनेक आळंदीतील नागरिकांनी यावेळी हजेरी लावली होती.आळंदी (हवेली भाग) धाकटी पादुका येथे बँड बाजाच्या वाद्यात ,फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच पुष्पवृष्टीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.पुणे ते आळंदी माऊलींच्या पालखी सोहळ्याने वरुणराजाच्या हजेरीत प्रवास केला.