एमपीसीन्यूज -आपल्या कुमारभवन च्या कुमार कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे (Talegaon)षटकार मारून कलापिनी कुमार भवन चा 8 वा वर्धापन दिन28/7/2024 रोजी उत्साहात साजरा केला. त्याच बरोबर कै. पुष्पलता अरोरा स्मृती पुष्प गुरुवंदना ही संपन्न झाली .
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे- डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी आणि श्रीमती ज्योती नागपूरकर, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे आणि कार्याध्यक्षा सौ. अंजली सहस्रबुद्धे, ह्या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली.
आपल्या सुंदर आवाजात मुलांनी श्लोक म्हणून वातावरण आल्हाददायी केले.ह्या नंतर कुमार भवनच्या मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला.कार्यक्रमाची सुरवात अतिशय सुंदर अशा दासबोध ओव्या गायनाने झाली. त्यानंतर विष्णू स्तोत्र म्हणून आपल्या गुरूंना वंदन केले.. ह्याचे निवेदन प्राची गुप्ते ह्यांनी केले.
सर्व श्लोक आणि गाणी ह्यासाठी मार्गदर्शन संपदा थिटे यांचे होते तर तबल्याची साथ आपल्याच कुमारभवनचा कलाकार ऋग्वेद अरण्यके याची होती.
हल्लीच्या मुलांची आवड म्हणजे फास्ट फूड आणि मोबाईल… त्यांच्या आवास्तव वापरामुळे होणारे दुष्परिणाम आपल्या कुमार कलाकारांनी त्यांच्या फास्टफूड आणि मोबाईल ह्या दोन्ही नाटिकेतून सादर केले… आणि एक सुंदर संदेश सर्वांसमोर मांडला… डॉ. अनंत परांजपे यांनी हयानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांची ओळख आणि सत्कार करण्यात आले… त्यानंतर ऋचा पोंक्षे यांनी गेल्या वर्षीचे अहवाल वाचन केले.. अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या कलापिनी कुमारभवन च्या सर्व प्रशिक्षिकांचे विशेष कौतुक केले.. गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आपण घेत असतो.. दरवर्षी कै. विनोदकुमार मेहता यांच्यास्मृती प्रीत्यर्थ श्री. प्रतीक मेहता हे मुलांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देत असतात. यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले.. त्यानंतर पालक म्हणून श्री आनंद कशेळकर यांनी कलापिनी विषयी आपले मनोगत व्यक्त केले.कुमार वयीन मुलांसाठी उत्तम काम करणारे कुमार भवन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साठी प्रामाणिक प्रयत्न करते आहे.आम्हा पालकांना त्याचे खूप समाधान मिळते असे ते म्हणाले.
कलापिनी चे सर्व कार्यक्रम कामाच्या व्यापात सगळ्यांना पहायला मिळतात असे नाही… त्यामुळे संस्थेने कार्यक्रमाची संक्षिप्त रूपरेषा यु ट्युब चॅनेल द्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हाती घेतले असून त्या यु ट्यूब चैनेल बद्दलची माहिती चेतन पंडीत यांनी सगळ्यांना सांगितली आणि ते लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्याने दिले.. त्यानंतर पाहण्यांचे मनोगत झाले.. ह्यामध्ये श्रीमती ज्योती नागपूरकर या पहिल्यापासूनच कलापिनीशी जोडलेल्या असल्याचे त्यांनी सांगीतले.. त्यांचा बालभवन पासून कुमारभवन सुरु करण्यापर्यंतचा प्रवास हे त्यांचे स्वप्न कसे पूर्ण झाले हे त्यांनी थोडक्यात सांगितले. त्यानंतर डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी यांनी स्वतःची माहिती देऊन आपल्या कुमारवयीन कलाकारांना आपली आवड चिकाटीने चांगल्या संस्काराखाली कशी जपावी असे सांगीतले.. तसेच त्यांनी कलापिनीच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले.. आणि मुलांना मार्गदर्शन केले.. त्यांनी आपल्या कामकाजातून वेळ काढून कलापिनीत येण्याचा प्रयत्न करीन असे सांगितले. आजकालचे युग डिजीटल असल्यामुळे सर्व गोष्टी छोट्या छोट्या यंत्रामध्ये सामावलेल्या आहेत. त्यामुळे ग्रंथालयाचा वापर कमी झाला आहे. ह्याचे महत्व ऋचा पोंक्षे लिखीत आणि दिग्दर्शित साहित्याचा ठेवा या नाटिकेतून कुमारभवनच्या मुलांनी त्यांच्या सुंदर अशा अभिनयातून सादर केले. संपदा थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांनी आम्ही मुले हे गीत सुंदर आवाजात सादर केले. त्यानंतर सर्व मुलांनी मग नृत्यातील आपली चुणूक दाखवली. विपुल परदेशी ह्यांनी बसवलेल्या एका सुंदर अशा जुन्या पण प्रसिद्ध गीतावर नृत्य मुलांनी सादर केलं आणि वाहवा मिळवली….
शेवटी विजय कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले आणि पठणं विपुलं या श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली….
अश्या अतिशय सुंदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय कुलकर्णी ह्यांनी केले.
तांत्रिक बाजू चेतन पंडीत आणि सुमेर नंदेश्वर ह्यांनी सांभाळली.तर रंगमंच व्यवस्था संदीप मन्वरे आणि हिमांशू चौधरी यांनी सांभाळली.कार्यकारिणी सदस्य सौ.लीना परगी,संजय मालकर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
कलापिनीच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला. सर्व कलापिनीतील प्रशिक्षकांच्या मेहनतीचे मुलांनी सार्थक केले त्यातून खऱ्या अर्थाने कलापिनीला गुरुवंदना ठरली.