एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात भाजप विषयक (Devendra Fadnavis) होणाऱ्या घडामोडी पाहता उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र भाजपचा मुख्य चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली येथे वर्णी लागण्याची शक्यता समोर आली आहे. काही दिवसांतच त्यांना दिल्लीला बोलावले जाऊ शकते. जे. पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने सध्या भाजपचे केंद्रीय अध्यक्ष पद रिक्त आहे. देवेंद्र फडणवीस यांना या पदासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचा पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तसेच त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी विनंती केली होती. तर विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या पक्षाची विस्कटलेली घडी त्यांना पुन्हा व्यवस्थित करायची आहे असेही त्यांनी सांगितले होते.
Pavana Dam Update : पवना धरण 91 टक्के; 1 वाजल्यापासून 3200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग
त्यामुळे फडणवीस यांना निवडणुकीपूर्वी भाजपचे हंगामी केंद्रीय अध्यक्षपद देऊन निवडणुकीनंतर त्यांना केंद्रीय अध्यक्ष बनवण्याची योजना भाजप पक्षाने केली असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसेच फडणवीस यांच्या ताकदीची व्यक्ती (Devendra Fadnavis) देखील महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व करणारी हवी. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व देखील कोण करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.