Explore

Search
Close this search box.

Search

February 11, 2025 10:11 am

MPC news

Pavana Dam Update : पवना धरण 91 टक्के; 1 वाजल्यापासून 3200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज – पवना धरण (Pavana Dam Update) सद्यस्थितीत 91% भरलेले असून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. पाणी पातळीत व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून 1800 क्युसेकने क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.

Pune : महापालिकेकडून नवले पूल ते सिंहगड रोडवर अतिक्रमणावर हातोडा

सद्यस्थितीत जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून एकुण 3200 क्युसेकने इतक्या क्षमतेने नदी पात्रामध्ये विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल. पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना नदीपात्रात कोणीही (Pavana Dam Update) उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर