Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:16 pm

MPC news

Bavdhan : ब्लॅकमेल करत केली 25 लाखांची मागणी, पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज –  एका व्यक्तीला बाहेर भेटायला बोलावून घेत त्याला (Bavdhan) सोबत राहण्यास सांगितले. सोबत राहायचे नसेल तर 25 लाख रुपये अथवा एक सदनिका घेऊन देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना 14 जून 2023 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत बावधन येथे घडली. 

दत्तात्रय सुरेश काळभोर (वय 41, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 36 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : पिंपरी न्यायालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या मैत्रिणीने दत्तात्रय यांना फोन करून आरोपी महिलेला भेटण्यासाठी बावधन येथील एका कॅफे मध्ये बोलावून घेतले. दत्तात्रय तिथे गेले असता आरोपीने दत्तात्रय यांना ‘तू माझ्यासोबत कोठेतरी सोबत रहा. नाहीतर मला माझा मोबदला म्हणून 25 लाख रुपये दे. अथवा वन बीएचके सदनिका दे’ अशी मागणी केली. तसेच आपली मागणी पूर्ण न केल्यास ‘तुझ्याविरुद्ध बलात्काराची केस दाखल करीन’ अशी धमकी(Bavdhan) दिली.

‘तू कधी पैसे, सदनिका देतो ते सांग  नाहीतर तुझ्या अख्ख्या खानदानाला माझ्या पायावर नाक घासायला लावीन’ अशी आरोपी महिलेने धमकी दिली. आरोपी महिलेने दत्तात्रय यांचा मित्र अमीर चौधरी यांना फोन करून एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. ‘मला सदनिका द्यायला सांग, नाहीतर 25 लाख रुपये तरी द्यायला सांग’ असे म्हणून शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत (Bavdhan) आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर