एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार ते पाच जणांच्या (Chinchwad) टोळक्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चिंचवड डी मार्ट जवळ घडली.
तन्वीर कुरेशी (रा. निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
Hinjawadi : पिस्तुलाच्या धाकाने भर दिवसा दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीर हे चिंचवड डी मार्ट जवळ (Chinchwad) असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तन्वीर यांच्या हाताला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधात पथके रवाना करण्यात आली आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत (Chinchwad) आहेत.