एमपीसी न्यूज – चार जणांनी भर दिवसा पिस्तुलाच्या धाकाने सराफी दुकानात दरोडा टाकल्याने खळबळ उडाली. ही घटना लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. 2) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली.
सुधाकर पोपट पाटील (वय 25, रा.दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chakan : महापारेषणच्या चाकण उपकेंद्रात बिघाड; निघोजे, नानेकरवाडी, कुरुळी परिसरात वीजपुरवठा खंडित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांचे हिंजवडी येथे लक्ष्मीचौक परिसरात शिवमुद्रा ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे, शुक्रवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. सव्वा दहाच्या सुमारास तीन चोरटे त्यांच्या दुकानात घुसले तर एक साथीदार बाहेर थांबला. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरवात केली.
इतर साथीदार दुकान लुटू लागले. चोरटयांनी बेंटेक्सचे बोरमाळ, पेंडल, नेकसेल, मंगळसूत्र, टॉप्स असा 17 हजार 600 रुपयांचा ऐवज बॅगेत भरला. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.