एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ( Kiwale) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत किवळे देहुरोड बाह्यवळण येथे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने ढोल ताशा वादनाने तसेच जेसीबी मधून पृष्पवृष्टी करून व फटाके वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले.
Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये झिकाचे दोन रुग्ण..
मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे (पाटील) यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले. या दरम्यान पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले , युवासेना प्रमुख चेतन पवार , महिला जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे, महिला शहर संघटिका अनिता तुतारे , माजी शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू , देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठे, उपशहरप्रमुख राजाराम कुदळे, उपशहर प्रमुख हरेश नखाते,शहर संघटक संतोष सौंदनकर,अमित बाबर,विशाल यादव, विभागप्रमुख संदिप भालके , विभागप्रमुख गोरख पाटील, विभागप्रमुख संजय वारे , उपशहर प्रमुख अमोल निकम, युवा सेनेचे समन्वयक संतोष म्हात्रे, उपशहर प्रमुख निखिल दळवी, समन्वयक गणेश आहेर, महिला विभाग संघटिका डॉ. वैशाली कुलथे, संघटिकाज्योती भालके यांच्यासह महिला व शिवसैनिक मोठ्यासंखेने भर पावसात उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उद्या पुण्यात मेळावा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे पुण्यात आले आहेत. पुण्याला जाताना शहरातील शिवसैनिकांनी ठाकरे यांचे स्वागत ( Kiwale) केले.